Thursday, April 27, 2017

मी मुख्यमंत्री बोलतोय...
संवाद युवा पिढीशी
प्रश्न पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 27 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय...या कार्यक्रमाच्या दुसऱ्या कडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी सर्व-सामान्यांना देणाऱ्या या कार्यक्रमात यावेळी विद्यार्थ्यांसाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणाया विषयावर प्रश्नोत्तरे होणार आहेत. 
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तरे देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेत, वैयक्तिक नसावेत, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी दिनांक 2 मे 2017 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत mmb.dgipr@gmail.com या ईमेलवर आणि 8291528952 या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरुपात किंवा ऑडिओ रेकॉर्ड करुन स्वत:च्या छायाचित्रासह पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...