Thursday, April 27, 2017

भारत सरकारच्या मल्टी टास्कींग
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 
नांदेड, दि. 27 :- भारत सरकार कर्मचारी निवड आयोगाची मल्टी टास्कींग परीक्षा-2016 ही रविवार 30 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 4 यावेळत नांदेड शहरातील एकूण 23 केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात सदरच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 10 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...