Sunday, March 26, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत
कोणत्याही वर्गातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र
नांदेड दि. 26 :-  शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" अंतर्गत अर्ज करण्यासाठी इयत्ता अकरावी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल विद्यार्थी पात्र, ही अट रद्य करण्यात आली आहे. आता कोणत्याही वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थ्यांना या योजने अर्ज करता येणार आहे, असे पुणे समाज कल्याण आयुक्त यांनी कळविले आहे.
या योजनेतील इतर नियम अटी पुर्वीप्रमाणेच लागू राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहि नमुना https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...