ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी
राज्य शासन प्रयत्नशील - महादेव जानकर
माणुस घडविण्यात
ग्रंथालयाचे मोठे योगदान आहे. म्हणून ग्रंथालय चळवळीला अधिक सक्षम करणे, बळकटी देणे
हे काम राज्य शासन निश्चित करेन. ही चळवळ वृद्धींगत करण्यासाठी केलेल्या मागण्यांना
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित न्याय मिळवून देतील. म्हणून राज्याचे
मुख्यमंत्री, वित्तमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी समवेत मुंबईला येथे लवकरच बैठक घेतली जाईल,
असेही श्री महादेव जानकर यांनी सांगितले.
लोकांच्या जीवनात प्रकाश
निर्माण करण्याचे काम ग्रंथालय करीत असतात. त्यामुळे ग्रंथालय चळवळ गावोगावी
पोहचली पाहिजे. या चळवळीकडे सर्वांनी सहानुभुतीने सहकार्याचा हातभार लावावा.
ग्रंथालयाच्या अनुषंगीक कर्मचारी व ग्रंथालय यांचे प्रश्न, मागण्या राज्य शासनाने
मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा त्र्यंबकराव झंवर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त
केली.
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष
ॲड मुक्तेश्वर धोंडगे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रारंभी चिंचोळी येथील छत्रपती
संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुधाकर कौशल्ये यांनी स्वागत करुन
अधिवेशनामागील हेतू विषद केला.
या एकदिवसीय अधिवेशनात
ग्रंथालय चळवळ वृद्धीगत करण्यासंबंधी मार्गदर्शन, ग्रंथालय चळवळीची सद्यस्थिती,
मागण्या व उपाययोजना, ठराव वाचन व मार्गदर्शन असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
या अधिवेशनास कंधार
तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड बी. के. पांचाळ, प्राचार्य डॉ. निवृत्तीराव
कौशल्ये, वसंत सुर्यवंशी, डॉ. रा. रा. बालेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक
गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, मराठवाड्यातील व नांदेड जिल्ह्यातील
वाचनालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथप्रेमी नागरिक आदी
उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment