Monday, March 6, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण
पुरस्कारासाठी अर्ज मागविले
नांदेड दि. 6 :-  दलित समाजाच्या उद्धारासाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांसाठी शासनाने सन 2017-18 करीता नांदेड जिल्हयातील होतकरू व नामवंत समाज सेवक आणि समाज कार्य करणा-या  स्वयंसेवी संस्था यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी बुधवार 15 मार्च 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
प्रस्ताव दाखल करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता करिता-  या योजनेनुसार दलित समाज इत्यादीचे सामाजिक, दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. सामाजिक क्षेत्रात किमान 15 वर्ष कार्य केलेले असावे. पुरुष कार्यकर्त्याचे वय किमान 50 वर्ष आणि महिला करिता 40 वर्षा पेक्षा वय कमी नसावे. कोणत्याही व्यक्तीचे आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजल्या जाणार नाहीत. हा पुरस्कार मिळण्यासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणताही पदाधिकारी पात्र असणार नाहीत. सक्षम अधिकारी, पोलीस अधीक्षक नांदेड यांचेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. समाज कार्य बाबतचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र  जोडण्यात यावा.
स्वयंसेवी संस्थेसाठी - समाज कल्याण क्षेत्रात दलित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय अत्याचार व अस्पृश्यता निर्मुलन, अंधश्रद्धा रुढी निर्मुलन जनजागरण इत्यादी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल.तसेच सामाजिक कार्याचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र जोडावा. संस्था पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 सोसायटी रजिस्ट्रेशन नुसार पंजीबद्ध असावी. समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य दहा वर्षापेक्षा अधिक असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणा-या संस्थाच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल. संस्थेचे कार्य राजकारण व पक्षा पासून अलिप्त व स्वतंत्र असावे. पाच वर्षाचा अहवाल जोडणे आवश्यक आहे. संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्या बाबतचे सक्षम अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,नांदेड यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
इच्छुक सामाजिक कार्यकर्ता व संचालक स्वयंसेवी संस्था यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक रोड, ग्यानमाता शाळे समोर नांदेड.यांचे कार्यालयात विहित नमुना व आवश्यक माहिती प्राप्त करून घेवून आपला प्रस्ताव बुधवार 15 मार्च 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत सादर करावा, असे सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण नांदेड यांनी कळवले आहे. विलंबाने व चुकीचे, अपूर्ण प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही म्हटले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...