Monday, March 6, 2017

  नांदेड तहसिल येथे आज
ग्राहक मार्गदर्शन मेगा शिबीर
नांदेड दि. 6 :- जिल्हा ग्राहक संरक्षण अंतर्गत भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबई यांच्या मार्फत ग्राहकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार 7 मार्च 2017 रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. करण्यात आले आहे.
या शिबिरास ग्राहकांना दुध, अन्नपदार्थ यामध्ये असलेली भेसळ, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम, व्यावसायिकांविरुद्धच्या तक्रारी इत्यादी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमास भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सहसचिव दिनेश भंडारे व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.
नागरिक व ग्राहकांनी मंगळवार 7 मार्च रोजी साजरा होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमास तहसिल कार्यालय नांदेड येथील बैठक हॉल येथे सकाळी 10 वा. उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...