Thursday, March 23, 2017

पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड दि. 23 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी सकाळी 10.45 वा. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत विमानाने लोहगाव विमानतळ पुणे येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3.10 वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. डिजीधन मेळावा-2017 या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थिती. स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण नांदेड. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नांदेड विमानतळाकडे प्रयाण व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेत विमानाने लोहगाव विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.  

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...