Thursday, March 16, 2017

राज्यातील सात लोकसमुहांना
अल्पसंख्यांक दर्जा
नांदेड दि. 16 :- राज्यातील लोकसमुहांपैकी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन व ज्यु अशा एकूण सात लोकसमुहांना "अल्पसंख्याक लोकसमुह" म्हणून घोषित करण्यात आले आहे. याची नोंद शासकीय तसेच विविध यंत्रणांनी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे केले आहे.
या परिपत्रकातील आशय पुढील प्रमाणे, राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन व ज्यु या सात लोकसमुहांना अल्पसंख्याक लोकसमूह असा दर्जा आहे. तथापि संबंधित लोकसमुहातील जनता व त्यांच्यासाठी योजना राबविणाऱ्या यंत्रणांमध्ये याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याचे निदर्शनास येते.  परिणामी, अल्पसंख्याकांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या लोकसमुहांपर्यंत पोहचण्यास अडचण येतात.
त्यामुळे सर्व प्रशासकीय विभागांनी राज्यातील लोकसमुहांपैकी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन व ज्यु या लोकसमुहांना शासनाने अल्पसंख्याक लोकसमुह म्हणून दर्जा दिला असल्याची बाब लक्षात घेवून योजनांची आखणी करावी व अल्पसंख्याक लोकसमुहांना त्याचा लाभ होईल याची दक्षता घ्यावी. तसेच आपल्या अखत्यारितील क्षेत्रामध्ये याबाबत संबंधित लोकसमुहांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असेही निर्देशीत करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...