राष्ट्रीय
निवृत्त वेतन योजना सेवा पंधरवड्याचे आयोजन
नांदेड, दि. 2
:- राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या परिणामकारक
अंमलबजावणीसाठी व संबंधिताच्या जागृती , सुविधाकरीता बुधवार 1 ते 15 फेब्रुवारी
2017 या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना
सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे. या सप्ताह दरम्यान आहरण व संवितरण अधिकारी
व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देवून आपल्या शंकाचे समाधान करुन घेवू शकतात.
राष्ट्रीय निवृत्ती वेतन
योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना “प्राणकिट” वाटप जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे. या “प्राण” क्रमांकाद्वारे
कर्मचाऱ्यांना स्वत:चे अंशदानाचा तपशील, वारसनोंद, गुंतवणुकीचा परतावा आदीबाबतची
माहिती पाहता येते. मोबाईल ॲप डाउनलोड करुन या सुविधेचा वापर करावा व या सेवा
पंधरवड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी केले
आहे.
000000
No comments:
Post a Comment