न्यायसहायक विज्ञान जागृती सप्ताहाचे
30 जानेवारी पासून आयोजन
नांदेड, दि. 24 :- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत दरवर्षीप्रमाणे
यावर्षी सोमवार 30 जानेवारी 2017 ते गुरुवार 2 फेब्रुवारी 2017 या कालावधीत
न्यायसहायक विज्ञान जागरुकता सप्ताह आयोजित केला आहे. विज्ञान, अभियांत्रिकी,
वैद्यकीय आणि विधी शाखेतील पदवीत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय
तथा विद्यापीठामार्फत या प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन
उपसंचालक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभाग नांदेड यांनी
केले आहे.
या कालावधीत प्रयोगशाळेची कार्यपद्धती पाहता
यावी याकरीता ही प्रयोगशाळा पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अभियोक्ता व
विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी शाखोतील पदवीत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थी
इत्यादी यांच्याकरीता खुली राहणार आहे. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा
नांदेड हे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील
गुन्हे विश्लेषणास मदत करणारी प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा अभ्यास पूर्ण
विश्लेषण अहवाल कमी वेळेत तपासणी यंत्रणांना उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील असते.
प्रयोगशाळा एकवर्षापासून डॉ. शंकरराव
चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जुनी इमारत दूसरा मजला वजिराबाद नांदेड येथे
कार्यरत आहे.
000000
No comments:
Post a Comment