राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी
जिल्ह्यात चित्रकला स्पर्धांचे आयोजन
नांदेड दि. 10
:- मतदारांमध्ये
जागृती व्हावी यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी 25 जाने रोजी राष्ट्रीय मतदार
दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षीही सर्व तालुकास्तरावर व मतदान केंद्रावर राष्ट्रीय
मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयातील तालुकास्तरावर 15 ते 17 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी “महत्व प्रत्येक मताचे” या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याची
माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
आयोगाने
यंदाच्या वर्षी नवमतदारांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यानुसार आयोगाने यंदाच्या
वर्षी "सक्षम करुया युवा व भावी मतदार” हे घोषवाक्य जाहीर केलेले आहे. त्यास अनुसरुन युवा मतदारामध्ये विशेषत:
वय वर्षे 15 ते 17 या वयोगटातील ( इयत्ता
9 ते 12 वी ) भावी मतदारामध्ये जागृती
व्हावी यादृष्टीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याअनुषंगाने
जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये वय वर्षे 15 ते 17
या वयोगटातील विद्यार्थींसाठी “महत्व
प्रत्येक मताचे” या संकल्पनेचा वापर करुन
चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामधून उत्कृष्ट दोन
चित्रांची निवड करून त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील
विजेत्यामधून जिल्हा स्तरावर दोन विजेत्यांची निवड करून त्यांची नामांकन पुरस्कारासाठी
राज्य स्तरावर पाठविण्यात येणार आहेत.
याशिवाय
प्रत्येक तालुक्यात वक्तृत्व स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,
quiz , घोषवाक्य स्पर्धा , युवा मतदार महोत्सव , रन फॉर वोट , निबंध स्पर्धा , रॅली इत्यादीचे आयोजन करण्यात
आलेले आहे. या विविध स्पर्धासाठी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. काही निवडक महाविद्यालयात
मतदान यंत्राद्वारे मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. या स्पर्धेत
सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment