जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर
नांदेड दि. 10
:- नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती
सभापती पदांचे आरक्षण आज येथे जाहीर करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश
काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे
सोडत काढण्यात आली. चक्रानुक्रमे व सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले हे आरक्षण 14 मार्च 2017 पासून सुरू होणाऱ्या
पुढील अडीच वर्षांकरिता लागू राहील.
आरक्षण सोडतीस
उपजिल्हाधिकारी सौ. अनुराधा ढालकरी, तहसिलदार डॅा. अरविंद नरसीकर, नायब तहसिलदार
डी. एन. पोटे, जी. एन. धसकनवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा
परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, नागरीक आदींची उपस्थिती होती.
सोडतीत पंचायत
समितीनिहाय निर्धारित करण्यात आलेले सभापती पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे :- कंधार – अनुसूचित जाती.
नायगांव खै. - अनुसूचित जाती (महिला). हदगाव – अनुसूचित जाती (महिला). माहूर –
अनुसूचित जमाती. बिलोली – अनुसूचित जमाती (महिला). किनवट – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
मुखेड – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. अर्धापूर – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
(महिला). भोकर - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला). नांदेड – सर्वसाधारण. उमरी
– सर्वसाधारण. लोहा – सर्वसाधारण. देगलूर – सर्वसाधारण. हिमायतनगर – सर्वसाधारण
(महिला). मुदखेड – सर्वसाधारण (महिला). धर्माबाद – सर्वसाधारण (महिला).
या आरक्षण सोडतीत
सात पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारणसाठी राहीले असून, त्यापैकी तीन पदे
महिलांसाठी असतील. तीन पंचायत समित्यांचे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून,
त्यापैकी दोन महिलांसाठी राखीव राहतील. दोन पंचायत समित्यांचे पद अनुसूचित
जमातीसाठी आरक्षित झाले असून, त्यापैकी एक महिलेसाठी राखीव राहणार आहे. चार पंचायत
समित्यांचे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, त्यापैकी दोन पदे
महिलांसाठी राखीव राहतील.
आरक्षण सोडतीत
उपजिल्हाधिकारी सौ. ढालकरी यांनी सादरीकरणाद्वारे आरक्षण पद्धतीची माहिती दिली.
त्यानुसार चक्रानुक्रमे व सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. त्यासाठी शालेय
विद्यार्थी ऋतुजा दिवेकर आणि रितेशसिंह परदेशी यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुढील अडीच वर्षांसाठी निर्धारित
करण्यात आलेले आरक्षण जाहीर केले. आरक्षण सोडत काढण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध
घटकांचे यावेळी आभार मानण्यात आले.
0000000
No comments:
Post a Comment