दिव्यांग
विद्यार्थीही राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होतील
-
जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड, दि. 20 :- दिव्यांग विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार यश मिळवून आम्ही सामान्य
विद्यार्थ्यांच्या मागे नाही हे अनेकवेळा दाखवून दिले आहे. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या
कलागुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते देशपातळीवरही यशस्वी
होतील असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला.
जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज
कल्याण विभागाच्यावतीने आज जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मैदानी क्रिडा
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी काकाणी
यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी पद्माकर
केंद्रे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, कार्यकारी अभियंता लांडेकर, शिंदे,
समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की,
दिव्यांग विद्यार्थ्यांतही सुप्त गुण दडलेले असतात अशा विद्यार्थ्यांची निवड करुन
त्यांचे वैशिष्ट्यपुर्ण सादरीकरण करावेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे
म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सहानुभुती बाळगू नका, त्यांना सक्षम समजून
सहकार्य करा.
प्रास्ताविकात समाज कल्याण अधिकारी सुनिल
खमीतकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या
हस्ते गोळाफेक स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवणारा लोहा येथील अंध
विद्यालयाचा विद्यार्थी शुभम बुरांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशेष शिक्षक
मुरलीधर गोडबोले यांनी केले. तर आभार यादव साळुंके यांनी मानले कार्यक्रमास
जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित
होते.
000000
No comments:
Post a Comment