Tuesday, December 20, 2016

जागतिक अपंग दिनानिमित्त
दिव्यांग विद्यार्थ्यांचा आज सांस्कृतिक कार्यक्रम
नांदेड, दि. 20 :-  जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक सोहळा बुधवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा परिषदेचे सभापती दिनकर दहीफळे, संजय बेळगे, वंदना लहानकर, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, प्रकल्प संचालक भातलवंडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास दिव्यांग विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ ...