Tuesday, November 1, 2016

केळी पिक संरक्षणासाठी
कृषि कार्यालयाचा संदेश
नांदेड दि. 1 –  कृषि कार्यालयांतर्गत मुदखेड व अर्धापूर तालुक्यात केळी पिकासाठी कीड व रोग सर्वेक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिकावर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी केळी पिकावरील प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. पिवळ्या रंगाचे डाग पानावर दिसून आल्यास त्वरीत कार्बेन्डॅझिम 50 डब्लु. पी. 0.1 टक्के एक ग्रॅम प्रती लिटर पाण्यात 1 मिली स्टीकर टाकून फवारणी करावी, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगडे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...