“कायदासाथी” प्रशिक्षण शिबीरात महिलांना मार्गदर्शन
नांदेड, दि. 20 :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)
तरोडा (बु.)
नांदेड येथील कार्यालयात अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाच्यावतीने “कायदासाथी” शिबीर संपन्न
झाले.
माविमद्वारे नांदेड शहरातील गरीब गरजू व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिलांचे एकूण 269 बचतगट स्थापन करून त्या माध्यमातून 3 हजार 211
महिलांना संघटीत करण्यात आले आहे. या महिलांचा आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टीने विकास व्हावा यासाठी माविम कार्य करीत आहे. त्यांना महिलांच्या संरक्षण कायदा विषयी तसेच त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरूध्द कायदेशीर लढा देता यावा यासाठी बचतगटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी “कायदासाथी” या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए.
आर. कुरेशी यांनी महिलांच्या अधिकारांबाबत व त्यांच्या संरक्षणाबाबत असलेल्या विविध कायद्यांची विस्तृत माहिती देवून विविध कायद्यांच्या माहिती पत्रकांचे वाटप केले.
यावेळी अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश, जे. आर. पठाण,
अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. एम. बिरादार, शिवाजीनगर, पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक श्री. पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भोंडवे, श्रीमती गंदेवार, अॅड.
प्रविण अयाचित, अॅड.
शिंदे, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी महिलांना मार्गदशन केले.
000000000
No comments:
Post a Comment