Thursday, October 6, 2016

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नांदेड, दि. 6 :- जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत 5 ऑक्टोंबर रोजी मालेगाव रोड गजानन महाराज मंदिर जवळील संध्या छाया या वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित ज्येष्ठ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेबाबत समुपदेशनपर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच आर गुंटूरकर व वृद्धाश्रम अध्यक्ष डॉ. पाटोदेकर यांची उपस्थिती होती. तसेच आज श्री स्वामी समर्थ मंदिर रयत रुग्णालयाजवळ ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी तपासणी शिबीर घेण्यात आले. या  शिबिरामध्ये 111 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात मधुमेहाचे 8 रुग्ण व उच्चरक्तदाबाचे 13 व मोतीबिंदुची 8 रुग्ण आढळून आली आहेत. शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र चिकित्सक डॉ. विवेक दिक्षित, जिल्हा कार्यक्रम समन्वयक  डॉ. प्रदीप बोरसे, सर्व एनसीडी कार्यक्रम कर्मचारी यांनी योगदान दिले.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...