आरोग्य शिबीरात
118 रुग्णांची तपासणी
नांदेड, दि. 28 :-राष्ट्रीय
असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यातीने आज हनुमानगड नांदेड येथे आरोग्य तपासणी
शिबिर घेण्यात आले. शिबिरात 118 रुग्णांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक आरोग्य व नेत्र इत्यादी आजारांची मोफत
तपासणी करण्यात आली.
तपासणीत
मधुमेहाचे 10, उच्चरक्तदाब 8, मौखिक
आरोग्याची 25 व मोतीबिंदुचे
55 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 50 रुग्णांत दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. शिबिराचे
उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. सी.घोडके, डॉ. ए. आय. शेख, एनसीडी अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.
0000000
No comments:
Post a Comment