दारु दुकाने आज बंद
नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात
मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने मोठया प्रमाणात ईद उल अझहा
(बकरी ईद) साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान जिल्ह्यात शांतता व
सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार
घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर
करुन जिल्हाधिकारी यांनी ईद उल अझहा (बकरी ईद) निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका,
जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, अन्य नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायत
हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-4 एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 व ताडी
विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल,
असेही या आदेशात नमुद केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment