जिल्ह्यात
पावसाच्या पुनरागमनामुळे
प्रशासनाकडून
सतर्कतेचा इशारा
नांदेड दि. 30 :- मराठवाडयात
काही ठिकाणी मध्यम ते मोठया स्वरुपात पाऊस पडण्याची आणि मेघगर्जनेसह या क्षेत्रात वीजा कोसळण्याची शक्यता
भारतीय हवामान खाते यांनी दिल्यामुळे जिल्हयात सतर्कता व दक्षता बाळगावी असा
इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
संततधार पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यास
शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प असर्जन नांदेडसह इतर प्रमुख बांधा-यातुन 95
ते 100 टक्के जलसाठा निर्माण
झाल्यास अतिरिक्त पाणी वेळोवेळी विसर्गाच्या रुपाने पुढे सोडावे लागण्याची दाट
शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत नदी-नाल्या काठच्या नागरीकांना
सतर्क रहावे. असेही सूचित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी पूर
नियंत्रण कक्ष सिंचन
भवन नांदेड येथे 24 तास कार्यान्वित
करण्यात आला असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 02462- 263870 असा आहे.
याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील
दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क
दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461,
पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क
दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या
दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
अधिकारी जयराज कारभारी यांनी कळवले आहे.
00000
No comments:
Post a Comment