जादुटोणा विरोधी
कायदा जनजागृती
समितीची
बैठक संपन्न
नांदेड, दि. 14 :- जादुटोणा विरोधी कायदा, जनजागृती प्रचार आणि प्रसार यासाठी नांदेड
जिल्ह्यात तालुकास्तरीय, तसेच ग्रामस्तरीय कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन
करण्यात यावे, तसेच जिल्हास्तरीय कार्यशाळेद्वारे अनेक संदेशदूत तयार करावेत, असे
निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
यांनी आज येथे दिले. जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम
अंमलबजावणी समितीची बैठक श्री. पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
त्यावेळी
ते बोलत होते. बैठकीस जनजागृती जिल्हास्तरीय समितीचे सचिव तथा सहायक समाज कल्याण आयुक्त भगवान वीर, जिल्हा
समन्वयक मच्छिंद्र गवाले, सहायक आयुक्त
एल.
के. चौरे आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र सरकारने नरबळी आणि इतर
अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम लागू केला
आहे. या जादुटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हास्तरीय
समित्यांचे गठन करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यात या कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी विशेष
प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामध्ये सुरवातीला तीन तालुकास्तरीय कार्यक्रमांचे नियोजन
करण्याचे, तसेच त्यानंतर ग्रामस्तरापर्यंत पोहचून विषयनिहाय जनजागृतीसाठी प्रयत्न
करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. सर्पदंश उपचारातील
अंधश्रद्धा, कुपोषण दूर करण्यासाठीचे अघोरी उपाय तसेच अन्य विघातक प्रथांबाबत
ग्रामस्तरांपर्यंत पोहचून जाणीव-जागृतीचे विशेषतः स्थानिक प्रबोधनकारांचे सहाय्य
घेण्यात यावे, असेही सुचविण्यात आले. जनजागृतीसाठी महाविद्यालय ते
विद्यापीठीयस्तरावर वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात याव्यात, स्वंयप्रेरीत आणि
लोकांच्या भाषेत जनजागृती करणाऱ्यांची मदत घेण्यात यावेत, असेही सांगण्यात आले.
00000000
No comments:
Post a Comment