डॉ. शंकरराव चव्हाण
वैद्यकीय महाविद्यालयातील
नेत्रदान
चित्रप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :- नेत्रदानाची जनजागृती व्हावी यासाठी 25 ऑगस्ट
ते 8 सप्टेबर 2016 या कालावधीत नेत्रदान
पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय
विष्णुपुरी नांदेड येथे नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त नेत्रदान चित्रप्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले असून नागरिकांसाठी चित्रप्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत
खुले राहील , या प्रदर्शनाचे नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर यांच्या हस्ते संपन्न
झाले. यावेळी प्राध्यापक डॉ. संतोष
सिरसिकर, नेत्र विभाग प्रमुख डॉ. विवेक सहस्रबुद्धे,
सहयोगी प्राध्यापक डॉ. राऊत, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. बोडके यांची उपस्थिती होती.
इच्छुकांना मरणोत्तर
नेत्रदानाचे संकल्प अर्ज भरण्याची व्यवस्था
करण्यात आली आहे. मागील पाच वर्षामध्ये जिल्ह्यात जवळजवळ 100 नेत्रांचे
संकलन जनतेच्या सहकाऱ्याने शक्य झाले आहे. गरजू रुग्णांना याचा लाभ झाल्याचे
समाधान मिळू शकले अशी भावना विभाग प्रमुखानी व्यक्त केली.
या
उपक्रमासाठी मार्गदर्शन प्राध्यापक डॉ. सहस्रबुद्धे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
विजय कंदेवाड, डॉ. गुंटूरकर, डॉ. इंगळे, डॉ. भोसीकर यांचे लाभले. कार्यक्रमाचे
संयोजन वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याखाता, रेसिडेंट डॉक्टर्स, इन्चार्ज
सिस्टर्स, श्री. कंधारकर, जिल्ह्यातील नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. दीक्षित, श्री.
तातोडे, श्री. घोडके, श्री. कागबटटे, श्री. मांजरमकर तसेच नेत्रदान समुपदेशक
श्रीमती ज्योती पिंपळे, श्री. गजानन टेकाळे, श्री. मोजेस यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment