Wednesday, August 24, 2016

कायदेविषयक शिबीर संपन्न
          नांदेड, दि. 24 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालामार्फत नमो कोचिंग क्लासेस नांदेड येथे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विष्णु गोडबोले यांनी शिक्षणाचा अधिकार याविषयी तर ॲड मुकुंद वाकोडीकर यांनी राष्ट्री विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना, ॲड श्रीमती घोरपड व ॲड श्रीमती झगडे यांनी महिलांचे अधिकार, शिक्षणाचा अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. न्या. कुरेशी यांनीही विविध योजना विषयांवर मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ॲड  मो. शाहेद इब्राईम यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्त्या सौ. उज्वला दरडा यांनी मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 244 साहित्यातून जगण्याची दिशा मिळते -जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख  वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक  शालेय...