महात्मा फुले विकास महामंडळाचे
योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या). नांदेड यांच्यामार्फत अनुसूचित
जाती व नवबौध्द नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या
महामंडळाच्या नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शनिवार 29 ऑक्टोंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज
दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाच्यावतीने 50 टक्के अनुदान योजनेची प्रकल्प
मर्यादा 50 हजार रुपये असून प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10
हजार रुपये अनुदान देण्यात येते. बीज-भांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा 50 हजार ते
5 लाखापर्यंत आहे. प्रकल्प मर्यादा 20 टक्के बीज भांडवल योजनेसाठी 4 टक्के व्याज
दराने कर्ज देण्यात येते. यामध्ये महामंडळाचे 10 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे.
बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड समान
हप्त्यात तीन ते पाच वर्षात करावी लागते, यात अर्जदाराचा सहभाग 5 टक्के आहे.
या योजनांसाठी अर्ज करताना पात्रतेचे निकष पुढील
प्रमाणे राहतील. अर्जदार अनुसूचित जाती, नवबौध्द
संवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. जातीचा व
उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला दाखला, उत्पन्न शहरी भागात 50 हजार 500
तर ग्रामीणसाठी 40 हजार 500 रुपयापेक्षा जास्त नसावे. पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा रहिवाशी
प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास
जागेचा पुरावा, व्यवसायनुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले जसे वाहनाकरीता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी, अधारकार्ड व पॅनकार्ड जोडावेत.
लाभार्थीने यापूर्वी महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज
अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच तो कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. लाभ
घेवू इच्छिणाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्तता करुनच अर्ज महामंडळाच्या
जिल्हा कार्यालयात शनिवार 29 ऑक्टोंबर 2016 पूर्वी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. एका व्यक्तीने एकाच योजनेमध्ये अर्ज करावा. अर्जदाराने
स्वत: मूळ प्रमाणपत्रासह कार्यालयात अर्ज दाखल करुन रितसर पोचपावती घ्यावी.
गैरअर्जदाराकडून अर्ज स्विकारले जाणार नाही, असे
महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकानी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment