वृत्त क्रमांक 940
गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड ते हदगाव वाहतुकीमध्ये बदल
नांदेड, दि. 5 सप्टेंबर :- हदगाव व उमरखेड शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी पैनगंगा नदीमध्ये होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी पैनगंगा नदी पुलावर गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. याअनुषंगाने उमरखेड येथून हदगावकडे येणारी वाहतूक पैनगंगा नदीपासुन ते मल्लीनाथ हॉलपर्यंत शनिवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 3 वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.
याबाबत मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील
तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. या
अधिसुचनेनुसार संबंधीत सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांनी वाहतुकीच्या अनुषंगाने
आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
00000
No comments:
Post a Comment