Thursday, September 18, 2025

 वृत्त क्रमांक 979 

पावडेवाडी येथे ग्रामीण स्वच्छता अभियान संपन्न  

 

 नांदेडदि. 18 सप्टेंबर :भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा मोहिम राबवल्या जात आहे. कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने पावडेवाडी (बु.) येथे ग्रामीण स्वच्छता अभियानाचे आयोजन करून ग्रामीण स्वच्छता अभियान घेण्यात आले.

 

या अभियानात पावडेवाडी ग्रामपंचायतचे बंडूभाऊ भाऊराव पावडेउपसरपंच बंडूभाऊ गंगाधरराव पावडेबाळासाहेब पावडेनितीन सावतेग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार रामोड महसूल अधिकारी शिवाजी तोतरेग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गावातील रस्तेसार्वजनिक ठिकाणेशाळा परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आणि ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली. ग्रामपंचायतचे उपसरपंच बंडू पावडे यांनी उपस्थितांना दोन वेळेस अल्पोपहाराची व्यवस्था केली.                               

 

17 सप्टेंबर रोजी श्री गुरुगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथील  प्राचार्य,  जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी दिनेश पोतदार   आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSSविभागाच्या सदस्य व संस्थेतील सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कंत्राटी निदेशक तासिका निदेशककार्यालयीन कर्मचारी व 150 ते 200 प्रशिक्षणार्थ्याच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने पावडेवाडी (वाडी बुद्रुक) या गावात ग्रामीण स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

 

या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि "स्वच्छ भारत" या संकल्पनेला बळकटी देणे हे होते. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहतासंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...