वृत्त क्र. 777
शुक्रवारचा आठवडी बाजार बंद
शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार आठवडी बाजार
नांदेड दि. 30 जुलै :- नांदेड जिल्ह्यात व शहरात 1 ऑगस्ट 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी शुक्रवार येत असल्याने यादिवशी नांदेड शहरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी भरण्यात येणार आहे, कृपया शेतकरी, ग्राहक, व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दर शुक्रवारी साठे चौक परिसर, व्हिआयपी रोड, महादेव दाल मिल ते आनंद नगर चौरस्ता रोड नं. 26 हमालपुरा, ईश्वरनगरकडे जाणारे रोडवर गोकुळनगर इत्यादी परिसरात मोठया प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो व बाजारचे दिवशी मोठी वर्दळ असते. या शुक्रवारी भरणाऱ्या बाजारामुळे जयंती सोहळयास, मिरवणूका यांना अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मार्केट अँड फेअर अँक्ट 1862 चे कलम 5 अन्वये 1 ऑगस्ट रोजी शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment