वृत्त
क्र. 744
ग्रामीण गुंठेवारी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात
दाखल करावेत
नांदेड दि. 18 जुलै :- गुंठेवारीचे
प्रस्ताव दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड
(चिखलवाडी कॉर्नर नांदेड) येथे गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी नांदेड
व अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास 31 डिसेंबर 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे
नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे गुंठेवारीचे
प्रस्ताव दाखल करावेत, असे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष)
तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी नांदेड
यांचे आदेशान्वये महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण)
अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील
बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका,
नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील
31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले
अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगररचना विभाग (शाखा
कार्यालय नांदेड) यांच्याकडे नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्यामार्फत
छाननी शुल्कासह प्रस्ताव दाखल करुन घेवून नांदेड व अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण
भागातील गुंठेवारीची सनद निर्गमित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नांदेड यांना प्राधिकृत
करण्यात आलेले आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष)
तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment