Monday, July 21, 2025

वृत्त क्र. 749

आज पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड, दि. 21 जुलै : नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शंकर महाविद्यालय, कौठा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन उद्या मंगळवार 22 जुलै 2025 रोजी  करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून शंकर महाविद्यालय, कौठा नांदेड येथे रोजगार मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये नामांकित उद्योजक तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून शंकर महाविद्यालय, नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार यांचा क्रमांक 9860725448 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...