वृत्त क्र. 714
ऑनलाईन उद्यम नोंदणी केलेल्या उद्योग घटकांना शासकीय योजनेचा लाभ
नांदेड दि. 10 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील ज्या उद्योग घटकांनी ऑनलाईन उद्यम
नोंदणी केली आहे परंतू शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही,
अशा उद्योग घटकांनी जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला सहकारी
औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
अमोल इंगळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत उद्योग संचालनालयाकडून
नांदेड जिल्ह्यात उद्योगाशी संबंधीत विविध योजनेची अंमलबजावणी ही जिल्हा उद्योग केंद्र नांदेड
कार्यालय करत आहे. त्यात उद्योग आधार नोंदणी ही माहे सप्टेंबर
2015 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणीकृत होत आहे.
00000
No comments:
Post a Comment