Monday, July 14, 2025

वृत्त क्र. 723

नोंदणीकृत उद्योजकासाठी आज जीईएम पोर्टल कार्यशाळा 

नांदेड, दि. 14 जुलै :-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे उद्या 15 जुलै 2025 रोजी जीइएम पोर्टल प्रशिक्षण आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमात जीइएम पोर्टल बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गवर्नमेट ई-मार्केटप्लस, नोंदणी, प्रोफाईल तयार करणे व अपडेट करणे, सेवा प्रभावीपणे सूचीबध्द करणे, जीइएम पोर्टलवरील श्रेणी आणि निविदा तयार करणे, शासकीय ठेकेदारी शासनाच्या जीइएम पोर्टल संदर्भातील माहिती बाबत तज्ञ मार्गदर्शका मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजना इतर शासकीय महामंडळातील योजनाची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. 

तरी प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक अक्षय ठोके, एमसीईडी, उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन एमसीईडी चे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...