Tuesday, June 24, 2025

वृत्त क्र. 656 

आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा

मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन होणार गौरव 

नांदेड दि. 24 जून :- सन 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव करण्यात येणार आहे. यानुसार अशा आणीबाणीधारकांना बुधवार 25 जून 2025 रोजी संबंधीत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्यानुषंगाने 25 जून रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्याच्या सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड, लोहा, कंधार, मुदखेड, हदगाव तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना बैठक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. न चुकता उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्या स्तरावरुन कळविण्यात आले आहे. संबंधित तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...