Friday, June 27, 2025

  वृत्त क्र. 669

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड दि27 जून :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तरी बाल शक्ती पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश डी. वाघ यांनी केले आहे.  

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी असावे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरीलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी अर्ज करु शकतात असे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

 निमंत्रण – जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल शुभारंभ सर्व मान्यवर पत्रकार बांधव, नमस्कार. जिल्हा परिषद नांदेड तर्फे विकसित जिल्हा परि...