Wednesday, June 11, 2025

वृत्त क्रमांक 599

जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 

पंचनामे तात्काळ सादर करा - पालकमंत्री अतुल सावे 

नांदेड दि. 11 जून :- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह पशु, कच्चा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडून घेतली व जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनास अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर  शासनस्तरावर निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेल्या मंडळामध्ये कंधार तालुक्यात कंधार मंडळात 85.75 मिमी, कुरूळा  86.00, फुलवळ 68.75, उस्माननगर 81.75, लोहा तालुक्यात लोहा, सोनखेड व कलंबर मंडळात प्रत्येकी 81.75  तर किनवट तालुक्यात जलधरा 72.75, शिवनी मंडळात 69.25 मि.मी. एवढ्या पाऊसाची नोंद झाली आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...