वृत्त क्रमांक 441
उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा
नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे आगमन व स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचा भुमिपूजन कार्यक्रम व नागरी सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 12 वा. परोटी तांडा येथून मोटारीने किनवट तालुक्यातील मानसिंक नाईक तांडाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. मानसिंक नाईक तांडा येथे आगमन व आमदार भिमराव केराम यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. मानसिंक नाईक तांडा येथून मोटारीने पुसदकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment