Saturday, April 26, 2025

 वृत्त क्रमांक 436

जल व्यवस्थापन पंधरवड्यानिमित्त पाणी वापराबाबत चर्चा

नांदेड, दि. २६ एप्रिल:- कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (द.) नांदेड व सहाय्यक अभियंता श्रे -1,उर्ध्व मानार प्रकल्प पाटबंधारे उपविभाग लोहा  यांच्या मार्गदर्शनाने व शाखाधिकारी शिर्ष शाखा लिंबोटी यांच्या समवेत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 निमित्त  *“महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण  व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे.

या कार्यक्रम अंतर्गत नगरपरिषद अहमदपूर जि.लातूर यांचे उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प लिंबोटी येथील उद्भव विहीर व अहमदपूर शहरातील जलशुद्धीकरण केंद्र येथे  मा.मुख्याधिकारी न.प.अहमदपूर संतोष लोमटे, योगेश कुचेकर- पाणीपुरवठा विभाग अभियंता,शेख मुसा- सहाय्यक पा.पु.विभाग यांच्या समवेत  पाणी वापर बाबत चर्चा करण्यात आली.

 यावेळी शाखाधिकारी ए.एम राजपूत, बी.एम.खेडकर- द.का.,एस.जी.वाघमारे - मोजणीदार,,एस.ई.बारोळे- कालवा निरीक्षक हे उपस्थित होते.

००००








No comments:

Post a Comment

  चला घडवूया विकसित महाराष्ट्र ! विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या! 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन ...