वृत्त क्रमांक 314
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिण्याचा
नांदेड दि. 20 मार्च : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधीत आस्थापनेत पुन्हा रुजु झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल.
ज्या प्रशिक्षणार्थीचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधीत आस्थापनेत रुजु होण्यासाठी उमेदवार रुजुची अंतीम तारीख ही 30 एप्रील 2025 असून संबंधीत आस्थापनांनी प्रत्यक्षात उमेदवारांना रुजु करुन घेऊन आस्थापनेच्या लेटरहेडवर नियुक्ती आदेश हार्डकॉपीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय, पहीला माळा शासकिय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड बाबानगर, नांदेड येथे प्रत्यक्ष जमा करावे.
या योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी Certificate of Incorporation/उद्यम आधार व EPF/ESIC/GST/DPIT यापैकी एक अशाप्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत सादर करावे. उमेदवार रुजु होते वेळी तो संबंधीत आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधीत इतर आस्थापना/कार्यालयात यापूर्वी कधीही कायम/तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.
तसेच संबंधीत आस्थापनेने ही कार्य प्रशिक्षणासाठी रुजु होणारा प्रशिक्षणार्थी यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधीत इतर आस्थापना/ कार्यालयात कायम/तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.
हे दोन्ही प्रमाणपत्र संबंधीत आस्थापनेने उमेदवार रुजु झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयास सादर करावे.
अधिक माहितीसाठी तसेच टेक्नीकल बाबीसाठी या मो.क्र.9420040964, 7083096554, 8830807312 क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment