वृत्त क्र. 143
खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक
नांदेड दि. ४ फेब्रुवारी : जिल्हात प्रजनन क्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा व अन्य सुविधा पुरविणाऱ्या सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आदेश सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी जारी केले आहे.त्यामुळे सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात प्रजनन क्षम पशूंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खाजगी पशु सेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरविणाऱ्या तंत्रज्ञ, गोठीत रेत मात्रा वितरक व रेत बँकांनी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा गोजातीय प्राधिकरण यांच्याकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आदेश काढण्यात आले आहे.
कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री भारतातील बहुउपयोगी कृत्रिम रेतनचे प्रशिक्षण घेतलेले असावे. तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण, आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव आहे. किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पशुसखी अशा पात्र खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानांना तंत्रज्ञांना पाच वर्षाकरिता 1000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात किंवा सहाय्यक आयुक्त जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नांदेड येथे भरून नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे.अन्यथा या कायद्याचे कलम चार व पाच अन्वये दंड आकारणी होऊ शकते, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजकुमार पडले यांनी दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment