वृत्त क्र. 1196
निवडणूक खर्चाचे लेखे सादर करण्याबाबत आज सुविधा प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 14 डिसेंबर : 16-नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक खर्च संनियंत्रणाच्या अनुषंगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचे लेखे विहित मुदतीत दाखल करणे सोयीचे होण्यासाठी उमेदवारांसाठी/खर्च प्रतिनिधींसाठी तसेच निवडणूक खर्च स्विकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी सुविधा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण उद्या सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत कै. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह, नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment