Sunday, October 13, 2024

वृत्त क्र. 935

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन 

नांदेड दि. 13 ऑक्टोबर :- महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शासकीय विमानाने नांदेडच्या गुरु गोविंदसिंहजी विमानतळावर आगमन झाले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब  ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

00000









No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...