वृत्त क्र. 969
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील अॅपवर
तसेच 1950 या टोल फ्रि नंबरवर दाखल करण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 ऑक्टोंबर : नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात आदर्श आचारसंहितेचे भंग झाल्यास सी-व्हीजील अॅपवर तसेच 1950 या टोल फ्रि नंबरवर नागरिकांनी तक्रार करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 तसेच, 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून 15 ऑक्टोंबरला घोषणा करण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व जिल्हयात आदर्श आचासंहिता लागू झाली आहे.
आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासून नांदेड जिल्हयात निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरीकांनी cVIGIL अॅपद्वारे तसेच १९५० या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी दाखल करु शकतात. सदरील तक्रारीचे फिल्डस्तरावरील FST टिमद्वारे प्राप्त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार १०० मिनिटात निकाली काढण्यात येते. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
नागरीक cVIGIL अॅपद्वारे जर कोणी बंदुक/पिस्तुल प्रदर्शन करणे,
दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी
मालमत्तेचे विद्रुपन, बनावट बातमी, मतदारांची
वाहतुक, भेटवस्तू वाटप, पेड न्यूज, जातीत तेढ निर्माण करणारे
भाषण, धमकी इत्यादी बाबत प्रकार होत असल्यास अशा घटनांचे cVIGIL
अॅपद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्ड
करुन ऑनलाईन तक्रारी दाखल करु शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा असे
आवाहन त्यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment