वृत्त क्र. 952
राज्यस्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्धेसाठी क्रीडा विभागाची तयारी
· जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
नांदेड दि . 17 ऑक्टोबर : राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नुकतीच पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील स्पोर्टडान्स क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सन 2024- 25 मधील राज्यस्तरीय क्रीडा राज्यस्तरीय खेळ स्पोर्टडान्स तसेच इतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा वयोगट 19 वर्षे मुले मुली स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याकडे आहे. त्याअनुषंगाने या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स डान्स कामाचा आढावा घेण्यात आला.
राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स संदर्भात स्पर्धेमध्ये 1 (क्लासिकल डान्स) शास्त्रीय नृत्य, 2 (फोक डान्स) लोकनृत्य, 3 (वेस्टर्न डान्स) पाशात्य नृत्य, 4 (हिप हॉप), 5 (बॅटल) या नृत्य प्रकारांचा स्पोर्टडांस स्पर्धेत समावेश आहे. तसेच विविध स्तरावर या स्पर्धा होणार आहेत. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील शाळांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व स्पर्धकांना विद्यार्थी मुले व मुलींना शाळेमार्फत संधी उपलब्ध करावी असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस कृषी उपसंचालक एच. एम. नागरगोजे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पाचंगे, जिल्हा समन्वयक शिक्षण विभाग प्राथमिक डॉ. डी.टी शिरसाट, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र चंदा रावळकर, संचालक, राष्ट्रीयसेवा विभागाचे समन्वयक डॉ. मल्लिकार्जुन काराजगी, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राहुल श्रीरामवार, बालाजी शिरसीकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बाळासाहेब डोंगरे व विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी वर्षा पाटील जोगदंड, बालाजी जोगदंड, विष्णु शिंदे, आनंदा कांबळे उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment