Monday, September 23, 2024

 वृत्त क्र. 857 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजन

 

नांदेड दि. 23 सप्टेंबर : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनवण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नौकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

 

शैक्षणिक संस्थामाध्यमिक शाळाउमावि / कमवि यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कामाचा अनुभव घेण्यासाठी या योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार घेता येणार आहेत. या मेळाव्यात सहभाग नोंदवण्यासाठी गटनिदेशक जी. जी. शेख 9860958403 व कनिष्ठ प्रशि. सल्लागार एन. एन.सामाले 8830479675 यांच्याशी संपर्क साधावा. या मेळाव्यात एमएसईबीएस. टी. महामंडळबाफना शोरूमतुलसी पेंटस इत्यादी आस्थापना सहभाग घेणार आहेत. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवार जे इयत्ता 12 वीपदवीपदविका उत्तीर्ण आहेत व ज्यांचे वय 18 ते 35 वर्ष आहे अशा उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावाअसेही आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...