वृत्त क्र. 784
नांदेड जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ई-मोजणी आज्ञावली कार्यान्वित
ई मोजणी बाबत आज अधिकारी कर्मचारी याना प्रशिक्षण
नांदेड, दिनांक 31 ऑगस्ट:- नांदेड जिल्ह्यात ई-मोजणी Ver-ll आज्ञावली ही पहिल्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख अर्धापुर, दुसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख हदगाव,मुदखेड व तिसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड, बिलोली व लोहा कार्यालयात कार्यन्वित करण्यात आली आहे . तसेच उर्वरित सर्व तालुक्यात उद्या ०१ सप्टेंबर २०२४ पासून कार्यन्वित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख व कर्मचारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे.ई-मोजणी Ver-ll आज्ञावली मधे नागरिकाना घरबसल्या ऑनलाइन मोजणी अर्ज करता येतो तसेच अर्जदार यांना अंक्षास व रेखांश आधारे नकाशा पुरविण्यात येणार आहे .त्यामुळे मोजणी कामात पारदर्शकता येणार आहे.
सदर प्रशिक्षण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सीमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज नियोजन भवन नांदेड येथे घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणास हजर होते.सदर प्रशिक्षणावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विचारलेल्या शंकेचे निरसन बी. व्ही मस्के उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment