Tuesday, July 30, 2024

वृत्त क्र 651

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आज अंतिम दिवस

 

नांदेड, दि. 30 जुलै : "प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यत मुदतवाढ दिली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचा आज शेवटचा दिवस असून या योजनेत ज्यांनी विमा काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी आज सहभाग नोंदविण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 1 रुपया भरुन पीएमएफबीवाय (PMFBY) पोर्टल http://pmfby.gov.in वर स्वत: शेतकऱ्यांना तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्रांमार्फंत  योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे.

 

या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू झाली असून सहभागाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आली होती. योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा भरणे बाकी आहे, त्यांनी आजच्या आज विमा भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही - जिल्हाधिकारी   आरबीआयच्या मार्गदर्शक सू...