Tuesday, May 28, 2024

वृत्त क्र. 450

 लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या

मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         आत्तापर्यंत 44287.28 ब्रास गाळ विविध तलावातून उपसला

·         गावपातळीवर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मोहीम सुरु


नांदेड दि. 28 :- सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध तलाव व धरणामधून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या या मोहिमेत सामाजिक संस्था व शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावातसेच तलावातील काढलेला जास्तीत जास्त गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेवून जावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील धरणामध्येतलावामध्ये दरवर्षी साठत चाललेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणातील व तलावातील साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेवून जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो) विभागातर्फे लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे यावर्षीच्या हंगामात निश्चित जलसंचय वाढणार आहे. तसेच पूरप्रतिबंधक उपाययोजना होऊन शेताची सुपिकता वाढणार आहे. जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत जसे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग नांदेड- 3356.89 ब्रासमृद व जलसंधारण विभाग-618.37 ब्रासनांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेड 40206.01 ब्रास गाळ काढला आहे. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (द) नांदेड-106.007 ब्रास अशी आतापर्यंत 44287.28 ब्रास गाळ जिल्ह्यातील विविध तलावामधून काढण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध 40 तलाव व धरणामधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नॅशनल हायवे विभागाने त्यांना देण्यात आलेल्या कामांच्या परवानगी मधून 201410 ब्रास गाळ/मुरुम काढून नव्याने निर्मित शेततळे शेततलावाद्वारे पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आवाहनानुसार जलसमृध्द अभियानातर्गंत लोकसहभागातून ही मोहीम सर्व उपविभागीय अधिकारीतहसिलदारगटविकास अधिकारीतालुका कृषी अधिकारीमुख्याधिकारी व विविध विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसह गावपातळीवर तलाठीमंडळ अधिकारी यांचे प्रयत्नांमधून सुरु आहे.

 0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...