Thursday, April 18, 2024

कृपया सुधारीत वृत्‍त घ्‍यावे ही विनंती.

 वृत्‍त क्र. 359

खर्चाच्‍या तफावती व त्रुटीसाठी आठ उमेदवारांना नोटीस देणार

 

खर्चविषयक दुसरी बैठक निरीक्षकांच्‍या समक्ष संपन्‍न

 

नांदेड, 18 एप्रिल- नांदेड मतदार संघातील उभे असलेल्‍या 23 उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींच्‍या उपस्थितीत दुसरी खर्च बैठक पार पडली. या बैठकीला दोन्‍ही खर्च निरीक्षक उपस्थित होते. आठ उमेदवारांना तफावत व त्रुटीच्‍या संदर्भात नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड तसेच  निवडणूक खर्च निरीक्षक मग्‍पेन भुटीयाउमेदवार व राजकीय पक्ष निवडणूक खर्च सनियंत्रण कक्ष प्रमुख  डॉ. जनार्दन पक्‍वाने यांच्‍यासह लोकसभा निवडणुकीतील अंतिम 23 उमेदवार आदीची उपस्थिती होती.

 

खर्च विभागाचे प्रमुख डॉ. जनार्दन पक्वाने यांनी दिलेल्‍या माहितीनुसार 8 उमेदवारांना खर्चातील तफावती व त्रुटींसाठी नोटीस बजावण्‍यात आल्‍या आहेत. ४८ तासात या तफावती व त्रुटी दूर कराव्‍या लागणार आहेत. अन्यथा तफावतीचा खर्च उमेदवारांनी मान्य केला असे गृहीत धरून तो उमेदवारांच्या खर्चात समाविष्ठ करण्यात येईल. यासंदर्भातील नोटीस उद्या बजावण्यात येणार आहे. त्यानंतर 48 तासात उमेदवारांना तुटी व तफावती दुरुस्त कराव्या लागणार आहेत. तिसरी बैठक २४ एप्रिल रोजी होणार आहे.

0000







No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...