Monday, March 11, 2024

 वृत्त क्र. 228 

प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली ॲपचे प्रशिक्षण


नांदेड, दि. 11 : भारत सरकारच्या कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या प्रादेशिक राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र, नागपुर व्दारा नांदेड जिल्हयातील विभीन्न तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

 

यासाठी प्रादेशिक राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र नागपुर कार्यालयाच्या सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी एस.एस.टाक यांनी उपस्थित राहुन शेतकऱ्यांना या ॲपबददल माहिती दिली आणि या ॲपमुळे शेतकऱ्यांना सहज पध्दतीने किडीची ओळख कशी करायची आणि ॲपमध्ये एडवाइजरीचा फायदा कसा घ्यायचा हे प्रात्यक्षिक करुन दाखवले.

 

त्याचबरोबर कापुस संशोधन केंद्र नांदेड येथे प्रक्षेत्र भेट घेण्यात आली. या  भेटी दरम्यान डॉ. पांडागळेडॉ. भेदे यांनी सहभागी शेतकऱ्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन केले. एकात्मिक किड व्यवस्थापनमित्र किडीची ओळखकिटकनाशकांचा सुरक्षित व योग्य वापरकिड रोगांची ओळख आणि त्यासाठीचे उपाय असे विषय या प्रशिक्षणामध्ये घेण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी आर.डी.मेरगेवार आणि मंडळ कृषि अधिकारी बी.ए.मुनेश्वर व एस.एस.देवकांबळे यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन सहयोग केले. प्रशिक्षणामध्ये नांदेड जिल्हयातील 11 प्रगतशिल शेतकऱ्यांनी भाग घेतला.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...