वृत्त क्रमांक 184
परीक्षा काळात शहरातील प्रमुख शाळांच्या परिसरात शांतता राखा : 144 कलम लागू
नांदेड दि. 29 : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यात आली आहे. या परिसरात शांतता राखावी. तसेच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यात व्यत्यय होईल अशा पद्धतीचे कोणतेही कार्य करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.
15 फेब्रुवारी पासून 2 एप्रिल पर्यंत सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक या परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सकाळी आठ ते चार वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस या परिसरात प्रवेश करता येणार नाही.
तसेच ग्यानमाता विद्या विहार, किड्स किंगडम पब्लिक स्कूल, नागार्जुना पब्लिक स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड, एकलव्य रेजिडेन्शिअल स्कूल सहस्त्रकुंड, जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर, केंद्रीय विद्यालय, सीआरपीएफ मुदखेड या शाळा परिसरात 100 मीटर पर्यंतची हद्द शांततेत पाळण्यात यावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment