वृत्त क्र. 44
जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतर्गत च्या कामासाठी
यंत्रधारकांनी 19 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेअंतर्गत विविध यंत्रणेमार्फत सिमेंट नाला बांध बांधणे, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण यासारखे विविध कामे केली जातात. नालाखोलीकरणासाठी शासनाने 4 सप्टेंबर 2017 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकान्वये नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी यंत्रधारकांनी जेसीबी/पोकलेन मशिन उपलब्ध केल्यास त्यांना प्रति घनमीटर इंधनासह जास्तीत जास्त 30 रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबत इच्छूक जेसीबी/पोकलेन यंत्र धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक यंत्रधारकांनी नोंदणी अर्ज जिल्हा जलसंधारण कार्यालयातून उपलब्ध करून घ्यावीत. तसेच अर्जात यंत्राच्या सविस्तर माहितीसह 19 जानेवारी 2024 पर्यत आपली नावे मृद व जलसंधारण कार्यालयात नोंदवावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, चैतन्य नगर, नांदेड-5 दुरध्वनी क्रमांक 02462-260813 किंवा कार्यालयाचा ई-मेल eesswcnanded@gmail.com व
जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षताद्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर यासाठी प्रयत्न करणे. तसेच मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे. उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा श्वाश्वत विकास करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment